Narendra Modi
Narendra Modi 
देश

Chandrayaan 2 : शास्त्रज्ञांनो, देशाला तुमचा अभिमान : मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनो, आज पूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. भारताला गर्व वाटेल अशी कामगिरी तुम्ही कायम केलेली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

इस्रोच्या शास्त्रज्ञांना पंतप्रधान मोदी यांनी शाबासकी देत म्हटले आहे, की तुम्ही देशाची सेवा केली, मानव जातीची सेवा केली, ही काही छोटी कामगिरी नाही, तुमचे अभिनंदन. इस्त्रोच्या प्रमुखांनी मला माहिती दिली असून, आम्हाला अजूनही आशा आहे. शास्त्रज्ञ खूप परिश्रम घेत आहेत.

चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा 'इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. भारताचा विक्रम अनुभवण्यासाठी पंतप्रधानांसह देशविदेशातील शास्त्रज्ञ 'इस्रो'च्या बंगळूर येथील मुख्यालयात उपस्थित होते. संपर्क तुटल्यानंतर 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी पंतप्रधानांना त्याची माहिती दिली. संपर्क तुटला असला, तरी कदाचित तो पुन्हा प्रस्थापित होण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची मोहीम भारताने आखली होती. ही मोहीम यशस्वी झाली असती तर या भागात यान उतरविणारा भारत पहिलाच देश ठरला असता. चंद्रावर यान उतरविण्याची किमया यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांनी केली आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यान उतरविणे एकाही देशाला शक्‍य झाले नव्हते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT