Beach Sakal
देश

Video Viral: वाह.. क्या समंदर असं म्हणत असताना डोळ्यादेखत 2 तरूणी गेल्या वाहून

एवढ्या खवळलेल्या समुद्रात या तरूणींचा जीव वाचवण्यासाठी कुणी धजावलंही नाही.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यामध्ये सध्या सगळं वातावरण कसं अकदम ओक्के आहे. काय ती झाडी, काय डोंगर, काय धबधबे, काय बीच.... एकदम ओक्के असं म्हणत पावसाळ्यात बाहेर फिरायला जाणाऱ्यांंची संख्या अधिक आहे. पण पावसाळ्यात फिरायला गेल्यावर आपापली काळजी घेणही तेवढंच महत्त्वाचं आहे. दोन तरूण मुली समुद्रात वाहून जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वाह.. क्या समंदर असं म्हणत एक तरुण कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. यादरम्यान एक मोठी लाट आली आणि त्यात दोन तरुणी वाहून गेल्या. हा सर्व प्रकार अवघ्या काही क्षणातच घडलाय.

(Beach 2 Young Girl Viral Video)

पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत असतात. अशावेळी पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीच्या वेळी फिरायला बीचवर जाणे धोकादायक असते. असाच एका बीचवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरूणी समुद्रात वाहून जाताना दिसत आहेत. तिला वाचवण्यासाठी काहीजण धावतात पण तोपर्यंत त्या समुद्रात आतपर्यंत वाहून गेलेल्या असतात. खवळलेल्या समुद्रात या तरूणींना वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. पण पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही पण समुद्राच्या ठिकाणी किंवा कुठेही फिरायला जाताना पर्यटकांना आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे. कारण एक चूकही आपला जीव घेऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT