Bees Attack School Children Esakal
देश

Bees Attack School Children: शाळकरी मुलांवर मधमाशांचा हल्ला, ४० जण जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

Bees Attack School Children: शाळा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला झाला आहे. घटनास्थळी गोंधळ आणि आरडाओरडा झाला आहे. या हल्ल्यामुळे शाळा बंद करावी लागली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. आग्राजवळील उर्जितम आर्यन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नरहौली येथे काल (सोमवारी) सकाळी आठच्या सुमारास मधमाशांनी शाळकरी मुलांवर हल्ला केला. मधमाशांनी मुख्याध्यापकांसह 40 मुले जखमी झाले आहेत. सहा मुलांना सीएचसीमधून रुग्णवाहिकेतून आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळा नुकतीच उघडली असताना शाळेबाहेरील मधमाशांचे झाडावरील पोळे फुटले आणि मधमाशांनी अचानक हल्ला केला. मुलं सैरावैरा धावत सुटली. शैक्षणिक कर्मचाऱ्यांना स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक मुले घराकडे धावत सुटली.

प्राचार्या मंजुरानी त्यागी यांनी सांगितले की, शाळेत सुमारे 40 मुले होती. मधमाशांच्या दंशामुळे जखमी झालेल्या मुलांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळेतील मुलांना घरी सोडून देण्यात आले.

सीएचसी बाहचे अधीक्षक डॉ. जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 6 मुलांना प्राथमिक उपचारानंतर एसएन मेडिकल कॉलेज, आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT