Karnatak Election Esakal
देश

Karnatak Election: कर्नाटकमधील निवडणुकीच्या तोंडावर CM शिंदेंचे सीमाभागातील नागरिकांना मोठं गिफ्ट

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव कारवार कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील बारा तहसील मधील 865 गावांना योजनेचा फायदा होणार आहे.

या योजनेअंतर्गत नागरिकांना प्रतिक कुटुंब प्रति वर्ष 1.5 लक्ष रकमेचे विमा संरक्षण रक्कम व 996 उपचारांचा लाभ मिळणार आहे. बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल व पणजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांमध्ये योजनेचा लाभ मिळणार आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका (१० मे) महिन्याभरात होणार आहेत. भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस आणि जेडीएस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. महाराष्ट्र सीमेलगत असलेला बेळगाव जिल्हा हा कर्नाटकच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना काय आहे?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय / निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो, याच बरोबर यावेळी संपूर्ण जगामध्ये कोविड -19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे तसाच राज्यामध्ये सुद्धा करोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला होता,

त्यामुळे शासनाने या योजनेच्या अंतर्गत, योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर सर्वच नागरिकांना या करोना महामारीच्या संकटामध्ये नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये आणि जनतेला आरोग्य विषयक हमी देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कालावधी शासनाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT