esakal
देश

भाजपच्या बैठकीपूर्वीच पंतप्रधान मोदी, अमित शहांना धमकी; एका नेत्याला अटक

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एका नेत्यानं धमकी दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना हैदराबादमधील एका नेत्यानं धमकी दिलीय. मात्र, पोलिसांनी (Hyderabad Police) आरोपीला अटक केलीय. ही व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विधानाबद्दल माफी मागण्याची मागणी करत असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण अशावेळी समोर आलंय, जेव्हा राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोन जणांनी एका शिंप्याची निर्घृण हत्या केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अब्दुल माजिद अत्तार (Abdul Majid Attar) हे एका छोट्या पक्षाचे नेते आहेत. पीएम मोदी आणि शाह यांच्याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रेषितांवरील वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांना नुकसान पोहोचवण्याचं बोललं होतं. अत्तार याला अटक करण्यात आलीय.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध धार्मिक भावना भडकावणं आणि विचलित केल्याप्रकरणी आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे, 2 जुलैपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या बैठकीत पीएम मोदी, शाह यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. यानंतर पीएम मोदी सिकंदराबादमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करू शकतात. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सिकंदराबादमध्ये नुकताच आंदोलकांनी गोंधळ घातलाय.

राजस्थानमधील उदयपुरात टेलरची निर्घृण हत्या

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल तेली नावाच्या शिंपीची निर्घृण हत्या करणाऱ्या रियाझ आणि मोहम्मद घौस या दोन आरोपींनी व्हिडिओही जारी केला होता. यातील एक व्हिडिओ हत्येचा होता. तर, एका व्हिडिओमध्ये दोन्ही आरोपी हत्येची जबाबदारी घेताना दिसत होते, यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना धमकीही दिली होती. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तपासात त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT