Behind west bengal tmc Mamata Banerjee attack on Congress fear of split in Muslim vote know the fact
Behind west bengal tmc Mamata Banerjee attack on Congress fear of split in Muslim vote know the fact  
देश

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी काँग्रेसला का दूर करत आहेत ? कोणत्या गोष्टीची वाटतेय भीती?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पण, सध्या इंडिया आघाडीचे भवितव्य अंधारात दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा घोषणा केली आहे. काँग्रेस तृणमूळशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थोडीही ढील देण्यास तयार नाहीत.(Behind west bengal tmc Mamata banarjee attack on Congress fear of split in Muslim vote know the fact)

मुस्लिम मतदारांवर लक्ष

काँग्रेसवर वारंवार टीका करुन ममता बॅनर्जी मुस्लिम मतांना विभागण्यापासून रोखत आहेत. राज्यातील सर्व मुस्लिम मतदार आपल्याकडेच राहावेत असा त्यांना इरादा आहे. राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेवेळी ममतांनी सर्व धर्म रॅली केली होती. त्यांनी काँग्रेवर टीकास्त्र देखील सोडले होते. त्यांनी काँग्रेसला हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपशी लढण्याचा सल्ला दिला होता. तसेच काँग्रेसला लोकसभेत ४० देखील जागा तरी मिळतील का याबाबत शंका वाटते असं त्या म्हणाल्या होत्या.

भारत जोडो न्याय यात्रेवर टीका

ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही टीका केली. यात्रा राज्यातील सहा जिल्ह्यांमधून गेली. यावेळी ममतांनी या यात्रेची तुलना प्रवासी पक्षांशी केली. केवळ फोटो काढण्यासाठी यात्रा काढण्यात आलीये असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. यात स्पष्ट संकेत मिळत आहेत की, ममतांना अल्पसंख्याक मतांमध्ये विभाजन नको आहे. २०११ मध्ये सत्तेत आल्यापासून ममतांची अल्पसंख्याक मतांवर मजबूत पकड आहे. अशावेळी त्या ही मतपेढी काही प्रमाणात देखील दुसरीकडे जाऊ देण्यास तयार नाहीत.

सत्तेत आल्यानंतर ममता सरकारने इमामांना भत्ते आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपची घोषणा केली होती. याशिवाय कल्याण बोर्डची निर्मिती आणि सरकारद्वारे मान्यता प्राप्त मदरशांना ५० कोटी रुपये अनुदान दिले जाते. ममतांनी सीएए-एनआरसीच्या विरोधातील आंदोलनाला समर्थन दिले होते. त्यामुळे मुस्लीम समुदाय ममतांच्या पाठिशी उभा आहे. त्यात काँग्रेसला वाटेकरी करणे ममतांना पसंत नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचं PM पद ते बारामतीचा खासदार कोण? पुण्याच्या ज्योतिषाचं मनमोहन सिंग यांच्याबद्दलचही भाकीत ठरलं होतं खरं

Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Latest Marathi News Live Update : भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत

Ganga River: अंत्यसंस्कारानंतर स्नानासाठी जाताना दुर्घटना! गंगा नदीत बोट उलटल्याने ५ जण बुडाले, माजी NHAI अधिकाऱ्याचाही समावेश

SCROLL FOR NEXT