देश

Loksabha 2019 : बेळगावात दुरंगी लढतीत भाजपचा वरचष्मा

जितेंद्र शिंदे

बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत राहिली आहे. जिल्ह्यात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (धजद) अस्तित्व नगण्य असल्यामुळे यंदाही तशीच लढत होणार आहे. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. शिवाय या मतदारसंघातून सुरेश अंगडी यांनी सलग तीन वेळा निवडून येऊन हॅटट्रिक साधलेली आहे. त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्‍चित आहे. हॅटट्रिक साधूनही अंगडी यांनी गेल्या पंधरा वर्षांत कोणतेच ठोस काम मतदारसंघात केलेले नाही. या मतदारसंघात काँग्रेसकडे अद्याप तगडा उमेदवार नाही. त्यामुळे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार अशोक पट्टण आणि जातीच्या आधारावर डॉ. अंजली निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत. सुरेश अंगडींना अंतर्गत आणि लोकांच्याही नाराजीला सामोरे जावे लागले असले, तरी काँग्रेसमधून बंडाचे निशाण घेतलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचासुद्धा अडसर काँग्रेसला असेल. त्यामुळे खा. प्रकाश हुक्‍केरींसारखा मुरब्बी नेता या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या मतदारसंघात मराठी मते निर्णायक ठरतात. त्यामुळे या मतांचा कल कोणाच्या बाजूने झुकणार, त्याचे पारडे वरचढ ठरणार आहे. चिक्‍कोडी लोकसभा मतदारसंघात अपवाद वगळता काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. गतवेळी आमदार असताना प्रकाश हुक्‍केरी यांनी खासदार रमेश कत्ती यांचा पराभव केला होता. हुक्‍केरी हे राजकारणात मुरलेले नेतृत्व. तथापि या मतदारसंघातील निपाणीसह चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे गेले आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत.

शिवाय या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी डॉ. प्रभाकर कोरे, जोल्ले उद्योग समूहाचे अण्णासाहेब जोल्ले यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला हा गड अबाधित ठेवणे वाटते तितके सोपे राहणार नाही.आपल्या वादग्रस्त वक्‍तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे हे कारवार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. या मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. हेगडे मंत्री असले तरी, या दोन्हीही मतदारसंघात त्यांच्या कामाबाबत नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून तगडा उमेदवार त्यांच्याविरोधात उभा राहिल्यास हेगडे यांना कठीण जाणार आहे. कर्नाटकाचे महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांचे पुत्र प्रशांत यांचे काँग्रेसकडून नाव चर्चेत आहे.

२०१४ चे मताधिक्‍य
    बेळगाव मतदारसंघ
    सुरेश अंगडी (भाजप) ः ५,५४,४१७ (विजयी)
    लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) ः ४,७८,५५७
    चिक्‍कोडी मतदारसंघ
    प्रकाश हुक्‍केरी (काँग्रेस) ः ४,७४,३७३ (विजयी)
    रमेश कत्ती (भाजप) ः ४,७१,३७०
    कारवार मतदारसंघ
    अनंतकुमार हेगडे (भाजप) ः ५,४६,९३९ (विजयी)
    प्रशांत देशपांडे काँग्रेस ः ४,०६,२३९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT