बेळगाव  Sakal
देश

बेळगावात डिसेंबरला विधीमंडळ अधिवेशन ; बसवराज होरट्टी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावला (Belgaum) डिसेंबर महिन्यांमध्ये हिवाळी विधीमंडळ अधिवेशन होणार असून, त्याच्या थेट प्रक्षेपणासाठी वेबकास्टची व्यवस्था करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी (Basavaraj Horatti) यांनी सोमवारी (ता.८) अधिकाऱ्यांच्या बैठकीत बजाविले.

आगामी विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर बसवराज होरट्टी यांनी सोमवारी (ता.८) भेट देऊन विधीमंडळ अधिवेशनाची पूर्वतयारी व माहिती घेतली. यावेळी वेबकास्ट संदर्भातही माहिती दिली. यामुळे अधिवेशनाचे थेट प्रसारण होणार आहे. वेबकास्टिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रत्येक विभागाच्या कार्यालयात ई-ऑफिसचा वापर सुरु आहे. यामुळे इंटरनेट व इतर सर्व सुविधा आठवडाभरात उपलब्ध करण्यात याव्यात. सुवर्णसौध सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्स व्यवस्था करणे आवश्यक आहे. जनतेला विधीमंडळ अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे, त्यासाठी कोणत्या सुविधांची व्यवस्था करणे जरुरी आहे. त्या सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात. अधिकाऱ्यांनी विधीमंडळ अधिवेशनाचे काम सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणतीही कसर कामात ठेवू नये, अशी सूचना केली.

तत्पूर्वी, सभापती होरट्टी यांनी विधानपरिषद सभागृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पहिल्या अधिवेशनाची माहिती दिली. विधीमंडळ अधिवेशनाचे थेट प्रसारण होणार करून जनतेपर्यंत प्रत्येक माहिती अधिवेशन संदर्भात पोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. या अधिवेशनाच्या तयारीबाबत बैठक घेऊन योग्य सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

यावेळी विधानपरिषद सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीवकुमार हुलकाई, एनआयसी अधिकारी संजीवकुमार क्षीरसागर, माहिती व प्रसिध्दी विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आणि ई-गव्हर्नन्स, एनआयसी, हेस्कॉमसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT