देश

कर्नाटक अधिवेशनात १३२ प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी दीड लाख कागद

नागेंद्र गवंडी

बेळगाव - अधिवेशनात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातील १३२ वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. आमदारांनी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना लेखी उत्तर देण्यासाठी दीड लाख ‘ए-फोर’ आकाराच्या कागदाचा वापर झाला असून दोन लाख रुपये खर्च झाला आहे. यासाठी ४० कामगार अधिवेशन काळात दिवस-रात्र कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हा पंचायत कार्यालयातून देण्यात आली. 

बेळगावात हिवाळी अधिवेशन आयोजित केल्यामुळे जिल्हा पंचायतीच्या कार्यालयावरही मोठा भार पडला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातून राबविलेल्या विकासकामांविषयी आणि समस्यांबाबत अनेक प्रश्‍न अधिवेशनात उपस्थित केले जातात.

यंदा १३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अधिवेशनातील नऊ दिवसांत ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाशी संबंधित १३२ प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. त्याची उत्तरे ग्रामविकास व पंचायत राज्य खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी दिली आहेत. पण, सर्व आमदारांना या प्रश्‍नाचे लेखी उत्तर देण्याचा नियम आहे. याप्रमाणे जिल्हा पंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर लेखी उत्तरे तयार करून त्याची प्रत विधिमंडळात देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

गेल्या नऊ दिवसांत एकूण १३२ प्रश्‍नांची लेखी उत्तरे देण्यासाठी १ लाख ५० हजार ‘ए फोर’ आकाराच्या कागदांचा वापर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि शुक्रवार असे प्रिंटिंगचे काम सुरू आहे. पंचायत राज विभागाकडे पाणीपुरवठा, रस्ते आणि पूल, नरेगा, स्वच्छ भारत मिशन आदी कामे केली जात आहे. या कामांविषयी कोणताही प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्‍नाचे उत्तर दिले जाते. या कामांसाठी एकूण जिल्हा पंचायतीच्या ४० कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

दोन प्रश्‍नांची उत्तरे सीडीतून 
अधिवेशनात १३२ प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रश्‍नांची उत्तरे ही सीडीच्या माध्यमातून देण्यात आली आहेत. प्रत्येक प्रश्‍नाला ५० सीडी लागल्या असून एकूण १०० सीडींचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी तीन हजार रपये खर्च करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT