देश

जगदीश मेटगुड, श्रीमंत पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कॉंग्रेसतर्फे आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या जगदीश मेटगुड, श्रीमंत पाटील यांचा समावेश आहे. तर बेळगाव दक्षिण मतदार संघातून एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तर फिरोज सेठ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

भाजपतर्फे बैलहोंगल येथून विद्यमान आमदार डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे भाजपचे इच्छूक उमेदवार व माजी आमदार जगदीश मेटगुड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी भाजपला रामराम करून कॉंग्रेसकडे उमेदवारीसाठी मागणी केली. मागणीला सकारात्मक प्रतिसाद पक्षाने दिला आहे. कॉंग्रेसने पहिल्या यादीत मेटगुड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवाय भाजपला येथून कडवे आव्हान मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

धजद पक्षाला रामराम करून अलिकडे श्रीमंत पाटील यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पहिल्या उमेदवारी यादीत पाटील यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळेच येथून धजदसह भाजप आमदार राजू कागे यांना कडवे आव्हान मिळणार आहे.

राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या 12 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. दुसरीकडे राज्यात धजद पक्षातून कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या 7 आमदारांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात भाजप व धजदमधून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या दोघांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. 
बेळगाव दक्षिण मतदार संघातून विधान परिषद सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीण लक्ष्मी हेब्बाळकर, चिक्कोडी सदलगा येथून गणेश हुक्केरी, गोकाक रमेश जारकीहोळी, यमकनमर्डी सतीश जारकीहोळी, खानापूर अंजली निंबाळकर, रामदूर्ग अशोक पट्टण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT