kissan google
देश

'पीएम किसान सम्मान निधि योजने'च्या लाभार्थ्यांना मिळणार अतिरिक्त आर्थिक लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११ शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणे देखील सोपे होणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा सामना केल्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकार लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, जेणेकरून उत्पन्न वाढवता येईल. तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात २ हजार रुपयांच्या हप्त्याव्यतिरिक्त, सरकार आता अनेक मोठे फायदे देत आहे. जर तुमचे नाव देखील या योजनेत समाविष्ट असेल तर तुम्ही घरबसल्या १५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ सहज मिळवू शकता. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे.

इतके लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतील

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने पीएम किसान ईपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ११ शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणे देखील सोपे होणार आहे.

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

होम पेजवर, EPO च्या पर्यायावर क्लिक करा.

आता नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा.

तुमच्या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.

यानंतर, तुम्ही पासबुक किंवा रद्द केलेला चेक स्कॅन करा आणि आयडी प्रूफ अपलोड करा.

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की आता पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित लोकांच्या खात्यातील २ हजार रुपयांचा ११ वा हप्ता कोणत्याही दिवशी खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. याचा फायदा १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT