Bengal teacher recruitment scam this is conspiracy against me Chatterjee ed trinmool congress politics  sakal
देश

बंगाल शिक्षक भरती गैरव्यवहार : ...हा तर माझ्याविरुद्धचा कट - चॅटर्जी

प. बंगालमध्ये राजकारण तापले; तृणमूलच्या निलंबित मंत्र्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : शालेय शिक्षक भरती गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (इडी) अटक केल्यानंतर व मंत्रिपदासह तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांवरून हकालपट्टी झाल्यानंतर आपल्याविरुद्ध कट आखण्यात आला असून आपण या कटाचे बळी ठरल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ईडीच्या कोठडीत असलेल्या चॅटर्जी यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी कोलकत्यातील कामगार विमा रुग्णालयात नेण्यात आले.

त्यावेळी वाहनातून उतरत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. यावेळी त्यांनी आपण कटाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असणाऱ्या चॅटर्जी यांच्यावर शिक्षणमंत्री असताना शालेय भरती गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या नजीकच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांनाही याप्रकरणी अटक केली असून तपाससंस्थेने घेतलेल्या झडतीत तिच्या विविध निवासस्थानांतून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रक्कम, दागिने आढळले आहेत.

दरम्यान, इडीने अर्पिता मुखर्जीशी संबंधित चिनार पार्कमधील तिसऱ्या सदनिकेवर धाड टाकली. अर्पिता यांच्या कोलकत्यातील बेलघोरिया परिसरातील एका सदनिकेतून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सुमारे २८ कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. या सदनिकेप्रमाणेच चिनार पार्कमधील तिसऱ्या सदनिकेतही रोख रक्कम ठेवल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. यासंदर्भात आम्ही शेजाऱ्यांकडून अर्पिता यांच्या सदनिकेत नेमक्या कोणत्या गोष्टी घडत होत्या, याची माहिती घेत आहोत. अर्पिता मुखर्जी यांनी चौकशीदरम्यान या सदनिकेबद्दल माहिती दिली होती, असेही त्यांनी पुढे सांगितले. त्याचप्रमाणे, कोलकत्यातीलच टॉलीगंज परिसरातील अर्पिता यांच्या आणखी एका सदनिकेतून सुमारे २१ कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे. त्याचप्रमाणे, कित्येक किलोंचे सोन्याचांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले असून त्यांचे मूल्य अद्याप निश्चित करायचे आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाच्या शिफारशीनुसार गट ‘क’ आणि गट ‘ड’ कर्मचारीभरती तसेच सरकारी व अनुदानित शाळांतील शिक्षकभरती गैरव्यवहारातील अनियमिततेचा तपास करत आहे. इडी याप्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करत आहे.

अर्पितांच्या चार मोटारी गायब

शिक्षकभरती गैरव्यवहारातील आरोपी अर्पिता मुखर्जी यांच्या चार आलिशान मोटारी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी यांच्या कोलकत्यातील टॉलीगंजमधील निवासस्थानी टाकलेल्या धाडीदरम्यान ईडीला त्यांच्या मालकीच्या ‘ऑडी४’, ‘होंडा सिटी’, ‘होंडा सीआरव्ही’ आणि ‘मर्सिडीज बेंझ’ या चार आलिशान मोटारींची माहिती मिळाली होती. यापैकी दोन मोटारींची नोंदणी अर्पितांच्या नावावर आहे. अर्पिता यांना अटक केल्यानंतर या चारही मोटारी आढळल्या नाहीत. त्यामुळे, ईडीचे अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

आपला पक्ष भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, हे दाखवून देण्यात व पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदासह तृणमूलमधून हकालपट्टी करण्यास ममता बॅनर्जी यांना सात दिवस का लागले? या गैरव्यवहाराचा एकूण आकडा २०० कोटींच्या पुढे गेला आहे. यापूर्वी, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या खासदारांची तृणमूलमधून हकालपट्टी केली नव्हती. मात्र, आता पक्षात बंडखोरी होत असल्याने व देश तृणमूलमध्ये कितीजण भ्रष्टाचारी आहेत, हे पाहत असल्याने बॅनर्जी यांनी ही कारवाई केली. शरीर वाचविण्यासाठी हात तर कापावाच लागतो.

- दिलीप घोष, खासदार, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT