cops 
देश

Cops Seize Explosives: बेंगळुरुमध्ये शाळेजवळ गाडीमध्ये आढळली स्फोटके; रामेश्वर कॅफेतील स्फोटानंतरची मोठी घडामोड

Bengaluru cops seize explosives: शहरातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका गाडीमधून स्फोटके जप्त केली आहेत.

कार्तिक पुजारी

बेंगळुरु- शहरातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी एका गाडीमधून स्फोटके जप्त केली आहेत. बेल्लांदूर प्रक्रिया शाळेजवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये पोलिसांना स्फोटके आणि जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(Bengaluru cops seize explosives from vehicle near school weeks after cafe blast)

पोलिसांनी घटनास्थळावरुन नोंदणी नसलेले इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर देखील जप्त केले आहे. बेंगळुरीतील रामेश्वरम कॅफेमध्ये तीन आठवड्यांपूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रीय झाली होती, मंगळवारी सकाळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका शाळेजवळ मोकळ्या मैदानात एक ट्रॅक्टर असल्याचं प्रशासनाला कळवण्यात आलं होतं.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना स्फोटके आढळून आली आहेत. स्फोटके आढळून आल्याने पोलीस याप्रकरणी गांभीर्याने तपास करत आहे. अनधिकृतपणे स्फोटकांचा साठा ठेवलेला असल्याने पोलीस पुढील कारवाई करत आहेत. घटनास्थळी असलेले ट्रॅक्टर आणि स्फोटके कोण ठेवले याबाबत कळू शकलेलं नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. (Latest Marathi News)

रामेश्वरम कॅफेमधील स्फोट

बेंगळुरुतील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी सौम्य स्वरुपाचा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास १० जण जखमी झाले होते. एका व्यक्तीने कॅफेमध्ये येऊन स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली होती. त्यानंतर एक तासांनी कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

तपास यंत्रणांनी एका संशयिताला अटक केली आहे. आरोपीवर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT