Crime News  
देश

Crime News : महिला दुचाकीवर बसलेली असताना रॅपिडो चालकाचे गाडीवरच हस्तमैथुन; तक्रार दाखल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - देशात महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राजकारण तापलं असताना कर्नाटकमधून महिला अत्याचाराची घटना समोर आली. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी शनिवारी एका रॅपिडो दुचाकी चालकाला अटक केली आहे. दुचाकी चालवताना चालकाने हस्तमैथुन केल्याचा आणि इच्छित स्थळी सोडल्यानंतर व्हॉट्सअॅपवरून त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पीडित अथिरा पुरुषोथमनने 21 जुलै रोजी ट्विटरवर तिची आपबीती शेअर केली. अथिरा मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ बेंगळुरूमधील टाऊन हॉलमध्ये गेली होती. निषेधाच्या ठिकाणाहून घरी जाण्यासाठी तिने रॅपिडो ऑटो बुक केला होता, परंतु अनेक वेळा प्रयत्न करून ऑटो मिळाला नाही. त्यानंतर तिने अॅप राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मद्वारे बाइक बुक करण्याचा निर्णय घेतला.

महिलेने ट्विट केले की, बाईक बुक केल्यानंतर रॅपिडो ड्रायव्हर वेगळ्या बाईकवर आला. रजिस्टर असलेली रॅपिडो बाईक सर्व्हिसिंगसाठी गेली आहे. मी अॅपद्वारे माझ्या बुकिंगची पुष्टी केली. त्यानंतरच बाइकवर बसले.

अथिरा म्हणाली की, ती एका निर्जन भागात पोहोचली जिथे आजूबाजूला इतर कोणतीही वाहने नव्हती. यावेळी ड्रायव्हरने गैरवर्तन केले होते. मात्र मला सुरक्षिततेची भीती होती. "प्रवासादरम्यान, एका दुर्गम भागात पोहोचलो तेव्हा आजूबाजूला इतर कोणतीही वाहने नव्हती. त्यानंतर आरोपी चालकाने एका हाताने बाईक चालवण्यास सुरुवात केली. तसेच अनुचित वर्तन (बाईक चालवताना हस्तमैथुन) केले. माझ्या सुरक्षिततेच्या भीतीने मी संपूर्ण घटनेदरम्यान शांत राहिले.

दरम्यान आपल्या घराचा पत्ता आरोपीला माहित होऊ नये म्हणून मी घराच्या 200 मीटर अलिकडेच उतरण्याचा निर्णय घेतला. "ट्रिप संपल्यानंतर तो मला व्हॉट्सअॅपवर सतत कॉल आणि मेसेज करू लागला. छळ थांबवण्यासाठी मला त्याचा नंबर ब्लॉक करावा लागला. अथिराने ड्रायव्हरसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. स्क्रीनशॉटनुसार, ड्रायव्हरने चॅटमध्ये हृदय आणि चुंबन इमोजीचा वापर केला. शिवाय "लव्ह यू" देखील लिहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT