Crime News 
देश

Crime News : 'आंटी' म्हटल्याने संतापली महिला! एटीएमच्या सुरक्षारक्षकाला केली चप्पलने मारहाण

रवींद्र देशमुख

बंगळुरू - कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका एटीएम शाखेतील सुरक्षारक्षकाला महिलेने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचं अजब कारण समोर आलं असून महिलेला आंटी असं संबोधल्याने महिलेने मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एटीएममधून पैसे काढले होते आणि ती केबिनच्या दरवाजाजवळ उभी होती. सुरक्षारक्षकाने, इतर ग्राहकांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी तिला "आंटी" म्हणत, बाजूला होण्यास सांगितले. यावेळी आंटी शब्दामुळे महिला चांगलीच संतापली. तिने कथितरित्या गार्डला तिच्या चप्पलने मारले. तसेच त्याच्यावर शारीरिक हल्ला केला, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.

घटनास्थळी असलेल्या लोकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, काही लोकांनुसार, महिलाचे मानसिक स्थिती ठिक नव्हती. आता पोलिस याबाबत तपास करत आहे. मारहाणीत सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली नाही. तर महिला जामिनावर बाहेर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT