Bermuda Interesting Facts esakal
देश

Bermuda Interesting Facts : अमेरिका-ब्रिटन बाजूला राहिले, बर्म्युडा ठरला जगातील सर्वात महागडा देश

बर्म्युडा आणि स्वित्झर्लंड हे राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे देश

सकाळ डिजिटल टीम

Bermuda Interesting Facts : बर्म्युडा आणि स्वित्झर्लंड हे राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे देश असल्याचा दावा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालात करण्यात आला आहे. 140 देशांच्या अहवालात असे म्हटले आहे की बर्म्युडामध्ये राहण्याची किंमत खूप जास्त आहे. या यादीत स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यूएस, यूके, जपान आणि रशियामध्ये राहणे बर्म्युडाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पण मग बर्म्युडामध्ये असं काय आहे की इथे राहणं खूप महाग आहे. बर्म्युडामध्ये महागाईची अनेक कारणं आहेत.

म्हणूनच बर्म्युडा महाग आहे

बर्म्युडा हे उत्तर अटलांटिक महासागर स्थित एक बेट आहे. ही यूके ओव्हरसीज टेरिटरी आहे. येथील समुद्रकिनारा आणि समुद्राचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. बेटांचा देश असल्याने इथे शेती नाही. आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इतर देशांतून आयात केली जाते. येथील बहुतांश जीवनावश्यक वस्तू अमेरिकेतून आयात केल्या जातात. वाहतूक खर्च, कस्टम ड्युटी आणि मजुरी यामुळे त्या गोष्टी महाग होतात.

इतर देशांच्या तुलनेत इथे राहणाऱ्या लोकांना एका गोष्टीसाठी कितीतरी पट किंमत मोजावी लागते. इतकंच नाही तर इथलं राहणं, जेवण, विमा आणि इतर खर्चही इतर देशांच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक आहेत. हे पर्यटकांसाठी अधिक महाग आहे कारण त्या वस्तूंवर अधिक नफा घेतला जातो. एवढं असूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात गुलाबी वाळूच्या या देशात येतात. बर्म्युडामधील हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 25,000 रुपये मोजावे लागतात.

पगार इतर देशांपेक्षा चांगला

विशेष म्हणजे महागडा देश असल्याने इथल्या लोकांचे उत्पन्नही तेवढेच आहे. इतर देशांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो. महागाईचा परिणाम इथल्या लोकांच्या उत्पन्नावर आणि पगारावर दिसून येतो.

बर्म्युडा, स्वित्झर्लंड, केमन आयलंड, बहामास, आइसलँड, सिंगापूर, बार्बाडोस, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील टॉप 10 सर्वात महागडे देश आहेत.तर राहण्यासाठी पाकिस्तान हा जगातील सर्वोत्तम देश आहे.

जगातील शीर्ष 10 स्वस्त देशांमधे पाकिस्तान, इजिप्त, भारत, नायजेरिया, बांगलादेश, तुर्की, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि रशिया यांचा समावेश आहे. या देशांमध्ये राहण्याची किंमत सर्वात कमी आहे. म्हणूनच त्यांना यादीत तळाशी ठेवलं आहे. जगातील महागड्या देशांची यादी दरवर्षी बदलते. यावर्षीच्या यादीत पाकिस्तान 140 व्या आणि भारत 138 व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

Mumbai Metro: मेट्रो प्रवासासाठी मिळणार फुल रेंज, नेटवर्कचा प्रॉब्लेम सुटला! प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Kolhapur Drown Case : कोल्हापूर जिल्ह्यात चार जणांचा बुडून मृत्यू, ऐन दिवाळीत दुर्देवी घटना

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

SCROLL FOR NEXT