BFSI Jobs eSakal
देश

BFSI Jobs : तरुणांसाठी खुशखबर! BFSI सेक्टरमध्ये तयार होणार 50 हजार नोकऱ्या; सणासुदीमुळे होणार मेगाभरती

BFSI Hiring : यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांचा समावेश आहे.

Sudesh

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रामध्ये येत्या काळात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे या संधी उपलब्ध होणार आहेत.

लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत या क्षेत्रात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. टीमलीज कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सणासुदीचा काळ आहे कारण

ऑगस्ट महिन्यांपासून भारतात सगळीकडे सणांची रेलचेल असते. पुढच्या पाच महिन्यांपर्यंत देशात कित्येक मोठे सण असतात. यामुळे लोकांची खरेदी वाढते. यासाठी कित्येक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळे BFSI सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे.

यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची देखील मागणी वाढते आहे.

कोणत्या शहरांमध्ये वाढ?

सणासुदीच्या काळात या क्षेत्रातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच वाढते. विशेषतः अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये ही वाढ दिसून येते.

यावर्षी पगारात वाढ

या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार किंवा भत्त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 ते 10 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे. टीमलीजच्या रिपोर्टनुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 20 ते 22 हजार रुपये पगार देण्यात येतो आहे.

दोन महिन्यात 25,000 नोकऱ्या

टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितलं, की येत्या काही पाच ते सहा महिन्यांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात आधीपासूनच झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 25,000 ओपनिंग्स भरल्या असल्याची माहिती चॅटर्जी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT