Unique Marriage In Bhagalpur esakal
देश

रब ने बना दी जोड़ी! 36 इंची मुन्नाचं 34 इंची ममताशी झालं लग्न

सकाळ डिजिटल टीम

भागलपूर जिल्ह्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.

Unique Marriage In Bhagalpur : भागलपूर जिल्ह्यात (Bhagalpur District) एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला निमंत्रण न देताही हजारो लोकांनी हजेरी लावली. या शानदार सोहळ्यादरम्यान नववधू-वरांसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली होती. वरमाला सोहळ्यादरम्यान लोकांचा स्टेजपर्यंत पोहोचण्याचा सिलसिला असा सुरू झाला की, थांबायचं नावच घेत नव्हता. खरं तर हे लग्न अनोखं ठरलंय. कारण, 36 इंची मुन्नाला त्याची जीवनसाथी मिळालीय.

असं म्हणतात की, लग्नगाठ वरूनच जुळून येते हे खरं आहे. आजपर्यंत आपण अनेक विवाहसोहळे पाहिले असतील आणि त्यात सहभागी झालेच असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या लग्नाबद्दल सांगत आहोत, ज्याच्या वधू-वरांची सर्वत्र चर्चा होत असून या विवाह सोहळ्याला पाहुण्यांची गर्दी झालीय. काही तर त्यात आमंत्रित देखील केलेले नाही, असे पाहुणे होते. त्यांनी वधू-वरांसोबत सेल्फी काढली.

भागलपूर नवगचिया परिसरातील अभिया गावात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नात वराचे वय 36 इंच तर वधूचे वय 34 इंच होते. विवाह सोहळ्यात न बोलावलेल्या पाहुण्यांची गर्दी होती. कारण, सर्वांनाच वधू-वरांना बघायचं होतं. उपस्थिती गर्दीतून दोघांनीही एकमेकांना पुष्पहार घातला आणि लग्नाचे इतर विधी पूर्ण केले आणि जन्मोजन्मासाठी एकमेकांचे झाले. किशोरी मंडळ उर्फ ​गुजो मंडळाची मुलगी ममता कुमारी 24 वर्षांची आहे. आणि मसारू येथील बिंदेश्वरी मंडळाचा मुलगा मुन्ना भारती वय 26 वर्षांचा आहे. वधू आणि वर दोघंही भागलपूर जिल्ह्यातील आहेत. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरुय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT