AI 
देश

VIDEO : पहा भगतसिंह, टिळक आणि विवेकानंदांचे हुबेहुब हावभाव; AI टेक्निकची अद्भूत कमाल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : शहिद भगतसिंह, स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांसारख्या मोठ्या विभूतींना पहायचं भाग्य आपल्याला लाभलं नाहीये. मात्र, या विभूती कशा दिसत असाव्यात हे आपल्याला त्यांच्या जुन्या फोटोज् मधून समजतं. त्यावरुन बरेचदा आपण त्यांच्या असण्या-दिसण्याचा अंदाज घेतो. त्यांच्या हावभावांचा आणि लकबीची कल्पना करतो. अनेकदा त्यांच्यावरील नाटके आणि चित्रपटांमधून अभिनयाद्वारे अनेक कलाकार त्यांचे पात्र आपल्यासमोर साकारण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, ही मोठी माणसे जशी आहे अगदी तशीच खरोखरच आपल्यासमोर आली तर? आश्चर्यचकीत झालात ना?

सध्या ट्विटरवर अशा अनेक महामानवांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ते जसे आहेत अगदी तसेच आपल्यासमोर उभे राहतात. फोटोंमधून नव्हे तर व्हिडीओंमधून... हो! आपल्याला खोटं वाटेल पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे खरं ठरलंय. यामध्ये भगतसिंह, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, कस्तुरबा गांधी, मुंशी प्रेमचंद आणि गुरु अरबिंदो यांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लेखक किर्तिक शशीधरण यांनी याप्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. AI अर्थात Artificial Inteligence च्या मदतीने हे व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं समजतंय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणीची कुणाला पसंती? भाऊ, भाई की दादा, घरातचं लागलं भांडण, श्रेयवादाच्या लढाईत कुटुंब फुटलं रे बाबा!

Pune Anganwadi Incident : पुण्यात अंगणवाडी सेविकेचा प्रताप, २० चिमुकल्यांना खोलीत कोंडले अन्... संतापजनक कारण समोर

AI Video Apps : AI ने बनवलेले व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे? पाहा एका क्लिकवर

Chanakya Niti: हितशत्रूंशी लढताना उपयोगी ठरणाऱ्या चाणक्यनीतीतील 3 खास रणनीती

Asaduddin Owaisi Viral Video : "आप पाकिस्तानी मुसलमानों को भाई समझते हैं?" असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले, व्हायरल व्हिडिओची चर्चा...

SCROLL FOR NEXT