OSD of Manish Sisodia arrested while taking bribe  Team eSakal
देश

भगवद्गीता अभ्यासक्रमात; सिसोदिया म्हणाले, "कर्म रावणासारखे अन् गप्पा..."

गुजरात सरकारने भगवद्गीतेचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधीर काकडे

गुजरात सरकारने (Gujrat Government) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इयत्ता ६ वी ते १२ वीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश (Bhagavad Gita in School Syllabus) करण्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता देशात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी, दुसऱ्या बाजूने या निर्णयावर टीका होतेय. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी देखील यावरून गुजरात सरकारवर टीका केली आहे.

गुजरात सरकारने नुकताच हा मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, आपल्या परंपरा अभ्यासक्रमाशी जोडणे, तसेच त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून गुजरातमधील शाळांमध्ये हा बदल लागू केला जाण्याची शक्यता आहे.

मनिष सिसोदिया यांनी या निर्णयाचं स्वागत करताना भाजपवर मात्र टीका केली आहे. सिसोदिया म्हणाले, "नक्कीच हे एक उत्तम पाऊल आहे. मात्र जे लोक या निर्णयाची घोषणा करत आहेत, त्यांनी आधी गीतेच्या मूल्यांचं पालन केलं पाहिजे. त्यांची कृत्यं रावणासारखी आहेत आणि ते गीते बद्दल बोलतात असं म्हणत सिसोदिया यांनी कानपिचक्या दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT