Bhagwant Mann Bhagwant Mann
देश

Teacher's Day : पंजाबमध्ये शिक्षकांना मिळाला 'मान' CM कडून '7th पे' ची घोषणा

1 ऑक्टोबर 2022 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

7th Pay Commission In Punjab Teachers : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. एका व्हिडिओ संदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची घोषणा केली.

1 ऑक्टोबर 2022 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सीएम मान यांनी लवकरच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापकांची भरती केली जाईल अशी घोषणाही मान यांनी केली आहे. यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सातवा वेतन आयोग आणि शिक्षक भरती बरोबरच जुन्या कंत्राटी अतिथी प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात येणार असल्याचं मान यांनी यावेळी जाहीर केलं याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री मान यांनी दिले आहेत. मान यांच्या या निर्णयांमुळे शिक्षण दिनी शिक्षकांना खरा मान मिळाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT