Bhaichung Bhutia Lost Assembly election 2024 in sikkim Esakal
देश

Assembly Election Result: टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या पदरी निराशा, 10 वर्षात पराभवाची डबल हॅट्रिक

Bhaichung Bhutia: भायचंग भुतिया बारफुंग मतदारसंघातून नशीब आजमावत होता. बारफुंगमधील ही लढत चौरंगी असून भाईचुंग भुतियासमोर क्रांतीकारी मोर्चाच्या आरडी भुतियाचे मुख्य आव्हान होते.

आशुतोष मसगौंडे

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भायचंग भुतियाचा सिक्कीम विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया सिक्कीम निवडणुकीतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होता.

भुतिया नामची जिल्ह्यातील बारफुंग मतदारसंघातून नशीब आजमावत होता. बारफुंगमधील ही लढत चौरंगी असून भाईचुंग भुतियासमोर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या आरडी भुतियाचे मुख्य आव्हान होते.

याशिवाय भाजपकडून ताशी दादुल भुतिया आणि सीएपी-सिक्कीममधून दादुल लेपचा हे इतर प्रमुख उमेदवार आहेत. 2019 मध्ये, सिक्कीम डेमोक्रॅटीक फ्रन्टच्या ताशी भुतिया यांनी बारफुंग जागा जिंकली होती.

10 वर्षात 6व्यांदा पराभव

माजी फुटबॉलपटूने पश्चिम बंगालमधून तृणमूलचे उमेदवार म्हणून दोनदा निवडणूक लढवली होती. 2014 ची लोकसभा निवडणूक दार्जिलिंगमधून आणि 2016 ची विधानसभा निवडणूक सिलीगुडीमधून पण त्या दोन्ही निवडणुकीत त्याचा पराभव झाला.

त्यानंतर त्याने आपला मोर्चा सिक्कीमकडे वळवला आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. 2019 च्या विधानसभा निवडणुका त्याने गंगटोक आणि तुमेन-लिंगी येथून लढल्या, परंतु त्यांच्या दोन्ही प्रयत्नांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गंगटोकमधून 2019 च्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT