bhajanlal sharma  esakal
देश

Rajasthan CM: मोदींनी भाकरी फिरवली, वसुंधराराजेंना डावललं! राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी 'या' नेत्याला दिली संधी

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वसुंधराराजे यांना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयापुढे माघार घ्यावी लागली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचं नावही भाजपकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलं. त्यानुसार, भजनलाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वसुंधराराजे याचं नाव मागे पडलं त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. (Bhajan Lal Sharma New Chief Minister of Rajasthan BJP announcement)

वसुंधराराजेंनीच केली घोषणा

राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याच नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु होती. (Latest Marathi News)

पण अचानक त्यांचं नाव या शर्यतीतून मागे पडलं आणि त्यांनीच भाजप आमदार भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. (Marathi Tajya Batmya)

दोन उपमुख्यमंत्री असणार

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा या दोघांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वासुदेव देवनानी यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

५०० रुपयांची लाच आणि थेट एसीबीच्या जाळ्यात! भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक प्रताप

Mumbai News: खाकी जाणार, सफारी येणार; ठाणे पालिकेतील शिपायांचा गणवेश रुबाबदार होणार

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT