bharat bandh 
देश

भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!

केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पाठिंबा दिलेल्या केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामगार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर विपरित परिणाम करणाऱ्या केंद्राच्या धोरणांविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळं बँकिंग, ट्रान्सपोर्ट यांसह विविध सेवांवर यामुळं परिणाम होण्याची शक्यता आहे. (Bharat Bandh Banking transport and other services will be hit for two days)

केंद्राच्या या धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं चर्चेसाठी २२ मार्च रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत २८ आणि २९ मार्च रोजी संप पुकारण्याबाबत निर्णय झाला. बैठकीत ठरलं की, विविध कामगार संघटना केंद्राच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, राष्ट्रविरोधी आणि सामान्य नागरिकांच्या विरोधातील धोरणांविरोधात निषेध करायचा. यामध्ये बँक संघटनांचाही सहभाग असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात तसेच बँकिंग सुधारणा कायदा २०२१ विरोधात या संघटना संपात सहभाग नोंदवणार आहेत.

रस्ते, वाहतूक कर्मचारी आणि वीज कामगारांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. रेल्वे कामगारांच्या संघटना आणि संरक्षण क्षेत्रातील कामगार देखील या संपाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेकडो ठिकाणी एकत्र येतील. त्याचबरोबर कोळसा, स्टील, तेल, टेलिकॉम, पोस्टल, इन्कम टॅक्स आणि इन्शुरन्स या क्षेत्रातील कामगार देखील या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे, असंही या निवदेनात म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं या संपाबाबत म्हटलं की, संपामुळं बँकिंग सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. आमची एसबीआयच्या खाशांना सल्ला आहे की, त्यांनी बँकिंग व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT