ANI
देश

Bharat Bandh : दहा वर्षे आंदोलनाची तयारी - राकेश टिकैत

सकाळ डिजिटल टीम

राकेश टिकैत म्हणाले की, कृषी मंत्री म्हणतात की चर्चेसाठी या. मात्र आम्ही कृषीमंत्र्यांना सांगतो की सरकार आम्हाला वेळ आणि जागा सांगू दे.

भारत बंदमुळे दिल्लीत महामार्गावर ट्राफिक जॅम झाले असून आंदोलक रेल्वे ट्रॅकवर असल्यानं रेल्वे सेवासुद्धा विस्कळीत झाली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी कृषी कायद्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, दहा वर्षे लागली तरी चालतील पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, कृषी मंत्री म्हणतात की चर्चेसाठी या. मात्र आम्ही कृषीमंत्र्यांना सांगतो की सरकार आम्हाला वेळ आणि जागा सांगू दे. फक्त चर्चेबद्दल बोलतात पण त्यासाठी प्रत्यक्षात यावं. सरकारने चर्चेसाठी कोणत्याही अटींशिवाय बोलवावं. दहा वर्षे लागली तरी चालतील आम्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून जाणार नाही.

भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर रास्ता रोको केला आहे. दिल्ली उत्तर प्रदेश यांच्यातील गाझीपूर सीमेवरही रास्ता रोको केला आहे. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी ट्राफीकसाठी अॅडवायजरी जारी केली आहे. दिल्लीतही भारत बंदमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. २० ठिकाणी रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. जवळपास २५ रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये आम्ही काही सील केलेलं नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे. बंदच्या काळात अॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स यांच्यासह अत्यावश्यक काम असलेल्यांना सोडण्यात येईल. दुकानदारांना आम्ही आवाहन केलं आहे की त्यांनी चार वाजेपर्यंत सर्व बंद ठेवावं. त्यानंतर दुकाने उघडावीत. इथं बाहेरून कोणीही शेतकरी आलेले नाहीत असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT