icmr, bharat biotech, vaccine, covaxin, human trials 
देश

भारतात नाकाद्वारे कोरोना लस लवकरच; दुसऱ्या टप्प्यात ट्रायलसाठी मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

भारत बायोटेकनं ही लस तायर केली आहे. कंपनीला लसीची दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी भारतात प्रतिबंधक लस दिली जात आहे. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिम सुरु झाली असून आतापर्यंत 53 कोटी डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस दिली जात आहे. तर फायजरची मॉडर्ना आणि जॉन्सनच्या लशींना मंजुरी मिळाली आहे. या सर्व लशी इंजेक्शनच्या सहाय्याने दिल्या जातात. आता यात एक अशी लस उपलब्ध होणार आहे जी नाकाद्वारे दिली जाणार आहे. भारत बायोटेकनं ही लस तायर केली आहे. कंपनीला लसीची दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला परवानगी मिळाली असून लवकरच क्लिनिकल ट्रायल सुरु होईल. जैवतंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लशीची पहिली ट्रायल ही 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर करण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. नाकाद्वारे दिली जाणारी भारत बायोटेकची ही पहिली नेजल लस आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.

याआधीही जैवतंत्रज्ञान विभागाने म्हटलं होतं की, कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. तसंच ही कोरोनावर अशी लस आहे ज्या लशीची ट्रायल भारतात माणसांवर होत आहे. पहिल्या टप्प्यात ज्या व्यक्तींवर ट्रायल घेतली गेली त्यात संबंधित व्यक्तींवर फारसे दुष्परिणाम झाले नाहीत. तशा प्रकारच्या तक्रारीही आल्या नाहीत. त्याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात लस सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. प्राण्यांवर घेण्यात आलेल्या ट्रायलमध्ये अँटिबॉडीज तयार होत असल्याचं दिसून आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT