Nasal Vaccine 
देश

Bharat Biotech: 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लवकरच येणार नाकावाटे दिली जाणारी लस

आता सुईची गरज भासणार नाही

सकाळ डिजिटल टीम

आता लवकरच 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नाकामार्फत देण्यात येणारी कोरोना वरील लस तयार केली जाणार आहे. भारत बायोटेकने लस तयार करण्याची परवानगी मागीतली आहे. 6 सप्टेंबरला, DCGI ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी इंट्रानासल कोविड लस iNCOVACC ला मंजूरी दिली.

भारत बायोटेकने आता 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाय़ी iNCOVACC ची सुरक्षितता, प्रतिक्रियाशीलता आणि रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी परवानगी अर्ज केला आहे. ही लस नाकाद्वारे दिली जात असल्याने, नाकात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. आणि विषाणू आत प्रवेश करताच त्याला निष्क्रिय करते.

आता दिली जात असलेल्या लसींप्रमाणे, सुईची गरज भासणार नाही. हे वापरण्यास देखील सोपे आहे, ते घरी देखील वापरले जाऊ शकते. यासाठी प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचीही गरज नाही. सुईमुळे होणारा त्रास, जसे की संसर्ग, किंवा लसीकरणानंतरच्या वेदना, यांच्या पासून आराम मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषाणू शरीरात जाण्यापूर्वीच मारण्याची क्षमता त्यात आहे, त्यामुळे शरीराच्या अवयवांना संसर्ग निर्माण होण्याचा धोका राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : राष्ट्रवादी आणि भाजपच्या महिला उमेदवारांनी एकमेकांना दिलं चॅलेंज

Nagpur News: नागपूर विमानतळाचा करार फेब्रुवारीत होण्याचे संकेत; एक वर्षापासून रखडले हस्तांतरण, एक एप्रिलपासून जीएमआरकडे सूत्रे जाण्याची शक्यता!

Raj Thackeray : बोटावरची शाई सॅनिटायझरने पुसली जातेय, सत्तेचा गैरवापर करुन निवडणुका जिंकण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Vijay Hazare Trophy: विदर्भाच्या पोट्ट्यांची नजर फायनलवर! कर्नाटकविरुद्ध गतवर्षीच्या पराभवाचा वचपा काढण्याची आज संधी

महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर थेट यमराजाशी गाठ! CM योगींचा गुंडांना 'कडक' इशारा

SCROLL FOR NEXT