Covaxin Sakal
देश

कोव्हॅक्सिनला मंजुरी कधी? WHO ने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून परवागनी मिळालेली नाही.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून परवागनी मिळालेली नाही. त्यासाठी आता प्रयत्न केले जात असून भारतात जानेवारीपासून आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक स्तरावर कोव्हॅक्सिन लशीचा वापर सुरु कण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळणे गरजेचं आहे. भारत बायोटेकला WHO ने परवानगी न दिल्यानं अद्याप इतर देशांमध्ये कोव्हॅक्सिनचा वापर सुरु केलेला नाही. आता कोव्हॅक्सिनला परवानगी कधी देणार याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे.

लशींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश व्हावा यासाठी भारत बायोटेक प्रयत्नशील आहे. कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर परदेशी जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली नसल्यानं कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही नागरिकांना क्वारंटाइनसह कोरोनाच्या इतर नियमांचे पालन करावे लागत आहे. जर जागतिक आऱोग्य संघटनेनं कोव्हॅक्सिनला परवानगी दिली तर या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना परदेशवारी करता येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं ट्विटरवरून माहिती देताना म्हटलं की, कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी मिळायला हवी याची आम्हाला कल्पना आहे. यासाठी अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. मात्र लशीला परवानगी देण्यासंदर्भात आम्ही कोणतीही घाई करू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एखाद्या लशीला परवानगी देण्याआधी आवश्यक ती काळजी घेतली जाते. यावर जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, लशीला आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याआधी ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं पाहणे गरजेचे आहे. सध्या भारत बायोटेककडून अधिकचा डेटा यासाठी आवश्यक असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

Smart Meter Policy: ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचा शब्द

Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

Snapchat Love Story: स्नॅपचॅटवर प्रेम ठरले पठ्याने थेट ओडिसा गाठले ; प्रेयसीला घेऊन पठ्ठ्या थेट गावात हजर

SCROLL FOR NEXT