covaxin. 
देश

लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना झाला कसा? भारत बायोटेकने दिलं स्पष्टीकरण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारत बायोटेकची स्वदेशी कोविड-19 लस Covaxin बाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. चाचणीमध्ये समावेश झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांना कोरोना झाल्याने लसीच्या प्रभावीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारत बायोटेकची लस Covaxin प्रभावी नसल्याची शंका घेतली जाऊ लागली आहे. त्यानंतर भारत बायोटेक कंपनीने Covaxin लशीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

लस किती प्रभावी आहे याचं उत्तर संपूर्ण चाचणी परिक्षण संपल्यानंतरच कळू शकेल, असं कंपनीने म्हटलं आहे. चाचणी रँडम आणि डबल-ब्लाईंड पद्धतीने घेतली जाते. त्यामुळे विज यांना दिलेली लस डबी होती का हे स्पष्ट नाही, असं कंपनीने म्हटलंय. कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर आरोग्य मंत्रालयानेही आपले निवेदन जारी केले आहे. लशीचे दोन डोस निश्चित कालावधीत दिल्यानंतरच शरीरात अँटीबॉडी तयार होत असतात. विज यांना आतापर्यंत एकच डोस मिळाला होता. त्यामुळे त्यांच्यात अजूनही पुरेशा अँटीबॉडीज तयार झाल्या नव्हत्या, असं मंत्रालयाने म्हटलंय. 

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमचा स्ट्राइक रेट 86 टक्के, किंगमेकरच्या...

Covaxin ची चाचणी लशीच्या दोन डोसवर आधारित आहे. 28 दिवसांच्या अंतराने हे डोस दिले जाणार आहेत. लशीचा दुसरा डोस दिल्यानंतर 14 दिवसांनी याचा प्रभावीपणा तपासला जातो. Covaxin लस दोन डोस दिल्यानंतरच प्रभावी ठरते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये 50 टक्के स्वयंसेवकांना Covaxin लस आणि 50 टक्के स्वयंसेवकांना डमी लस दिली जाते. 

विज यांना कोरोनाची लागण झाल्याने सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण, चाचणीदरम्यान प्रत्येक स्वयंसेवकाला डोस दिला जात नाही. काही जणांना डमी लस दिली जाते आणि याबाबत गुप्तता पाळली जाते. एका कोडद्वारे त्याचे ट्रॅकिंग केली जाते. त्यामुळे लस दिल्यानंतरही विज यांना कोरोना झाला असं म्हणणं चुकीचं आहे. चाचणीतील अर्ध्या लोकांना डोस दिला जातो आणि अर्ध्या लोकांना अन्य औषध दिलं जातं. चाचणीच्या शेवटीच याचे विश्लेषण केले जाते. 

चाचणीमध्ये लस दिल्यानंतर स्वयंसेवकाला याबाबतची माहिती दिली जात नाही. कारण याचा लशीचा परिणामांवर प्रभाव पडत असतो. शिवाय स्वयंसेवकांनी लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरिरामध्ये पर्याप्त अँटिबॉडी तयार होत असतात. शिवाय काही जणांना जास्तीच्या डोसची आवश्यकता असते. विज यांना एकच डोस देण्यात आला होता, शिवाय त्यांना देण्यात आलेला डोस डमी नव्हता, याबाबत निश्चित असे सांगता येत नाही. त्यामुळे विज यांना कोरोनाची लागण होणे यात काही आश्चर्य नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT