Bharat Jodo Yatra Rahul Gandhi esakal
देश

Delhi Police : वाजपेयींच्या राष्ट्रीय समाधीस्थळाला राहुल गांधी भेट देणार; पोलिस म्हणाले, आम्हाला काय..

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज सकाळीच दिल्लीत पोहोचली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज सकाळीच दिल्लीत पोहोचली आहे.

देशात सुरु असलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता दिल्लीत पोहोचलीये. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज (शनिवार) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यांना आदरांजली वाहतील.

यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहतील. मात्र, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) यासंदर्भात कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नसल्याचं सांगितलं.

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं की, राहुल गांधी राष्ट्रीय स्मारकावर पोहोचल्यानंतर वाजपेयींच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) आदरांजली वाहण्यासाठी राहुल गांधी राजघाट, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्मारक शांती वन, इंदिरा गांधी यांचं समाधी शक्तीस्थळ, राजीव गांधी यांची समाधी वीरभूमी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी विजय घाटालाही भेट देतील.

यादरम्यान या नेत्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला अभिवादन करून देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी प्रेरणा घेतील. दुसरीकडं दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, 'पक्षानं राहुल गांधींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भेटीबाबत पोलिसांना माहिती दिली नाही किंवा परवानगीही घेतली नाही.'

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज सकाळीच दिल्लीत पोहोचलीये. बदरपूर ते आश्रम या प्रवासात हजारो समर्थक सहभागी झाले होते. काँग्रेसनं राहुल गांधींच्या या संपूर्ण यात्रा मार्गावर तिरंगा, फुगे तसंच राहुल गांधींचे फोटो असलेले बॅनर लावले होते. हरियाणा-दिल्लीतील शेकडो लोक बदरपूर सीमेवर मोर्चात सामील झाले आणि त्यांनी भारत जोडो आणि राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. दरम्यान, यात्रेत सहभागी झालेला काँग्रेस नेता कन्हैया कुमार यानं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT