Rahul Gandhi Sakal
देश

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची कार्ल मार्क्ससोबत तुलना; पण व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

या फोटोचा मूळ फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या देशभरात गाजत आहे. या यात्रेदरम्यानचे त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये कधी ते लहान मुलांसोबत पुशअप्स करतायत, तर कधी मुलींसोबत फिरत आहेत. असाच त्यांचा एक दाढीतला फोटोही व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो खरा आहे की खोटा? जाणून घ्या.

राहुल गांधी यांचा दाढीमधला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधींना अनेकांनी प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्सचीही उपमा दिली आहे. मात्र हा फोटो एडिट केलेला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधींच्या डोक्याचे आणि दाढीचे केस थोडे वाढवण्यात आले आहेत. आणि ते कार्ल मार्क्ससारखे लावण्यात आले आहेत.

या फोटोचा मूळ फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा मूळ फोटो पाहिल्यास आपल्याला लगेचच लक्षात येईल की राहुल गांधींचा हा फोटो एडिटेड आहे. कार्ल मार्क्सप्रमाणे दाखवण्यासाठी हा फोटो एडिट करण्यात आला आहे. राहुल गांधी अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे याआधीही चर्चेत आले आहेत. कधी त्यांच्या टीशर्टची किंमत चर्चेत आली आहे. तर कधी त्यांचे पावसात भाषण देतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ४० दिवस सुरू असलेल्या या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या लूकमध्ये बदल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT