Bharat Ratna esakal
देश

Bharat Ratna : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 10 जणांना भारतरत्न; 'यांना' मिळाला सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार येऊन दहा वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे. या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने दहा जणांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान- भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. विशेष म्हणजे चालू वर्षात आतापर्यंत पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार येऊन दहा वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे. या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने दहा जणांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान- भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. विशेष म्हणजे चालू वर्षात आतापर्यंत पाच जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान नरसिंह राव, चरणसिंह चौधरी आणि कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर केल्याचं ट्वीट करत सांगितलं. नुकतंच लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे.

२०१९ मध्ये नानाजी देशमुख, भूपेंद्र कुमार हजारिका, प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाला होता. तर २०१५ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय, अटल बिहारी वाजपेयी यांना भारत्न जाहीर झाला होता.

दहा वर्षांत दहा जणांना भारतरत्न

  • १. माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव- २०२४

  • २. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह- २०२४

  • ३. एमएस स्वामीनाथन- २०२४

  • ४. लालकृष्ण आडवाणी- २०२४

  • ५. कर्पूरी ठाकूर- २०२४

  • ६. नानाजी देशमुख- २०१९

  • ७. भूपेंद्र कुमार हजारिका- २०१९

  • ८. प्रणव मुखर्जी- २०१९

  • ९. पंडित मदन मोहन मालवीय- २०१५

  • १०. अटल बिहारी वाजपेयी- २०१५

या दहा दिग्गजांना सरकारने भारतरत्न दिला. विशेष म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तसे भारतरत्न पुरस्कार जाहीर होत आहेत. मागच्या काही दिवसात पाच जणांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT