Bharatpur Accident: 
देश

Bharatpur Accident: भरतपूरमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात! मथुरेला दर्शनासाठी जाणाऱ्या 11 भाविकांचा मृत्यू

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - Bharatpur Accident News राजस्थानमधील भरतपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. NH 21 वर असलेल्या लखनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हंत्रा पुलावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाविकांना घेऊन ही बस गुजरातहून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात होती. या बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस भावनगरहून मथुरा येथे जाण्यासाठी निघाली होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अज्ञात वाहनाने पार्क केलेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच लखनपूर, नादबाई, हलैना, वैर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT