देश

Bhimashankar Controversy: वादात अडकलेल्या गुवाहाटीच्या भीमाशंकरचा काय आहे इतिहास?

आसाममधील गुवाहाटीमध्ये हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे

सकाळ डिजिटल टीम

आसाम  सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे.  6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आसाम सरकारची ही जाहीरात ट्विट केली असून शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केलीय. 

आसाममधील गुवाहाटीपासून 13 किमी अंतरावर पामोहीजवळ दैनी पहाड या नावाने ओळखल्या जाणार्‍या डाकिनी टेकडीवर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममधील एका टेकडीवर आहे. माता कामाख्या मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या मधोमध दीपोर बील येथे त्याचे पवित्र स्थान आहे.

आसाममधील गुवाहाटीमध्ये हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे. भिमाशंकर अशी या स्थानाची ओळख असली तरी महाराष्ट्रातही असेच एक ठिकाण आहे. ज्याला १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.

भीमाशंकरच्या दर्शनासाठी कामरूपच्या सुंदर पर्वत आणि जंगलांमधून चालत तिथल्या निर्जन दरीमध्ये पोहोचावे लागते. या गर्दी झाडीत भगवान शंकर विराजमान असल्याचे मोहक रूप पाहता येते.

या मंदिरात उत्तर भारतातील भक्तांची गर्दी असते. गुवाहाटीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या या धामचे वैशिष्ठ्य म्हणजे या शिवलिंगावर अखंड जलाभिषेक सुरू आहे. पावसाळ्यात तर हे शिवलिंग ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रातच असते.

इथे मंदिर नाही. चहूबाजूंनी डोंगर असून शिवलिंगाच्या माथ्यावरून सतत पाणी वाहत असल्याचे दिसून येते. या धामच्या मार्गावर गणेशाचे मंदिर देखील आहे.

पौराणिक कथा

भिमाशंकराची उत्पत्ती त्रेतायुगात झाली होती. त्याकाळात रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण याच्या वीर्यापासून कर्कटीच्या पोटी भीमासुराचा जन्म झाला. तो क्षत्रिय जातीचा होता. तो या पर्वतावर राहत होता. दशरथचा मुलगा श्री राम याने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटी आपल्या मुलासह तेथे राहू लागली.

कर्कटीने वडिल कुंभकर्ण यांचा वध श्री रामांनी केला. असे भिमासुराला सांगितले. याचा बदला घेण्यासाठी भिमासुराने ब्रम्ह देवांची तपश्चर्या केली. भगवान ब्रम्हा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी भिमासुराला शक्ती प्रदान केली.

त्या शक्तीचा प्रयोग भिमासुराने देवतांच्यावर केला. सर्व देवता चिंतीत होऊन शंकरांना शरण गेले. त्यामुळे भगवान शंकरांनी त्याचा वध केला त्यामुळे त्या वनात ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आणि त्याला भिमाशंकर असे नाव पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT