Bhojshala Latest News
Bhojshala Latest News Esakal
देश

Bhojshala Latest News: भोजशाळा मशीद आधी होतं सरस्वती मंदिर, माजी ASI अधिकाऱ्याचा मोठा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

Bhojshala Latest News: ज्ञानवापीनंतर आणखी काही मंदिरे चर्चेत आली आहेत. अशातच मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा/कमल मौला मशिदीबाबत प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के मुहम्मद यांनी मोठा दावा केला आहे.

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के मुहम्मद यांनी रविवारी दावा केला की, मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा/कमल मौला मशिद परिसर हे सरस्वती मंदिर होते आणि नंतर त्याचे इस्लामिक प्रार्थनास्थळात रूपांतर करण्यात आले. हिंदू आणि मुस्लिमांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी मतभेद दूर करण्यासाठी चर्चेसह प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चा आदर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मथुरा आणि काशीबाबत मुस्लिमांनीही हिंदूंच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असं देखील पुढे मुहम्मद म्हणाले आहेत.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील विवादित भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण करत आहे. हिंदूंच्या मतानुसार हे देवी वाग्देवी (सरस्वती) चे मंदिर आहे तर मुस्लिम समुदाय त्याला कमल मौला मशिद म्हणतात.

माजी ASI अधिकारी मुहम्मद म्हणाले, 'धार (भोजशाळा) बद्दलची ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे की, ते सरस्वती मंदिर होते. तिचे इस्लामिक मशिदीत रूपांतर करण्यात आले. परंतु प्रार्थना स्थळ कायदा 1991 नुसार, धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी आधारभूत वर्ष 1947 आहे. 1947 मध्ये मंदिर असेल तर ते मंदिर आहे आणि जर मशीद असेल तर ती मशीद आहे.

१९७६-७७ मध्ये अयोध्येत मुहम्मद हे प्राध्यापक बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या उत्खनन पथकाचा भाग होते. ते पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी याआधी असा दावा केला होता की, त्यांनी पहिल्यांदा बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिराचे अवशेष पाहिले आहेत. दोन्ही पक्षांनी या कायद्याचा आदर करावा. उच्च न्यायालय सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

11 मार्च रोजी उच्च न्यायालयाने एएसआयला सहा आठवड्यांच्या आत भोजशाळा संकुलाचे 'वैज्ञानिक सर्वेक्षण' करण्याचे निर्देश दिले होते. रविवारी सर्वेक्षणाचा तिसरा दिवस होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT