Leopard sakal
देश

Bhopal : दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्तेही कुनोत राष्ट्रीय उद्यानात येणार

भारतात शनिवारी दाखल होणार; दीर्घकाळ विलगीकरणामुळे तब्येतीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ- (पीटीआय): नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात १२ चित्ते दाखल होत आहेत. येत्या शनिवारी १८ फेब्रुवारीला मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्यांचे स्वागत होणार आहे. यात सात नर आणि पाच मादी चित्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्यास विलंब झाल्याचा फटका खुद्द चित्त्यांनाच बसला आहे. ते जुलैपासून विलगीकरणात असल्याने काहींची तब्येत खालावल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे महासंचालक अमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय तज्ज्ञांचे पथक आफ्रिकेला रवाना झाले. १६ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेला हवाई दलाचे विमान रवाना होत आहे. दक्षिण आफ्रिकेत फिंडा आणि रुइबर्ग येथे विलगीकरणात असलेल्या चित्त्यांची तज्ज्ञांकडून पाहणी केली जाईल.

त्यानंतर भारतात त्यांना आणण्याची प्रक्रिया सुरू होईल. १७ फेब्रुवारी रोजी घेऊन हवाई दलाचे विमान भारताच्या दिशेने उड्डाण करेल. हे विमान शनिवारी सकाळी ग्वाल्हेर येथील हवाई दलाच्या तळावर उतरेल. त्यानंतर अर्ध्या तासांनी हे चित्ते हेलिकॉप्टरने १६५ किलोमीटर अंतरावरील शेवपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्क येथे आणले जातील.

या ठिकाणी विलगीकरणासाठी तयार केलेल्या कुंपणात त्यांना सोडले जाईल. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आदी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कुनो अभयारण्यात १२ चित्त्यांच्या स्वागताची तयारी झाली आहे. नामिबियातून आलेल्या चित्त्याप्रमाणेच त्यांना जंगलात सोडले जाईल.

दक्षिण आफ्रिकेने चित्ते भेट स्वरूपात दिले आहेत. परंतु भारताला प्रत्येक चित्त्यासाठी ३ हजार डॉलर मोजावे लागणार आहेत. भारताने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यांत दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्याचे नियोजन केले होते. परंतु उभय देशातील कराराला विलंब झाल्याने चित्ते आणण्याच्या प्रक्रियेला उशीर झाला.

भारतात पाठवण्यापूर्वी चित्ते बराच काळ विलगीकरणात राहिले आहेत. त्यांनी बराच काळ शिकार केलेली नाही. परिणामी बारा पैकी सात चित्यांचा फिटनेस कमी झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यांना १५ जुलै २०२२ पासूनच विलगीकरणात ठेवले असून अजूनही त्यांना बाहेर काढले नाही.

७५० चौरस किलोमीटर क्षेत्र

कुनो अभयारण्य सुमारे ७५० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे.हे ठिकाण चित्त्यांसाठी अनुकुल आहे. प्रत्येक चित्त्याला दहा ते वीस चौरस किलोमीटरची जागा लागते आणि त्यानुसार कुनो येथे पुरेशी व्यवस्था आहे. या अभयारण्याचा बहुतांश भाग सपाट आहे आणि वनसंपदा देखील विपूल आहे. त्यामुळे आफ्रिकी चित्त्यांसाठी ही जागा उपयुक्त मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT