mp news 
देश

भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Sandip Kapde

मध्य प्रदेशातील एक थेट लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका मद्यधुंद व्यक्तीने पायऱ्यांवर बसलेल्या आदिवासी तरुणावर लघवी केली. आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजप आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहे. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली. त्याचे नाव पाले कोल असून तो सिधी जिल्ह्यातील करोंडी गावचा आहे. मात्र, हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे सांगितले.

केदारनाथ शुक्ला यांचा मुलगा गुरुदत्त शरण शुक्ला यांनी सांगितले की, हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही आणि त्याचा आधीच राजीनामा घेण्यात आला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला

सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या क्रुरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि अधोगतीला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. लघवी करणारी व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे, असे काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT