Uttar Pradesh BJP President Bhupendra Choudhary esakal
देश

UP : भाजप अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भूपेंद्र चौधरींनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी लखनौमध्ये पदभार स्वीकारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी लखनौमध्ये पदभार स्वीकारला आहे.

उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदाची (Uttar Pradesh BJP President) सूत्रं हाती घेतल्यानंतर, भूपेंद्र चौधरी (Bhupendra Chaudhary) यांनी पंचायत राज मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. चौधरींनी ट्विट करून ही माहिती दिलीय.

चौधरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीसाठी आज मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या सूचना, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि आशीर्वादासाठी त्यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत.

भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी सोमवारी लखनौमध्ये पदभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले, मी केंद्रीय नेतृत्वाचं आभार मानतो की त्यांनी मला यूपीची महत्त्वाची जबाबदारी दिलीय. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथपर्यंत पोहोचवणं ही भाजपची ताकद आहे. मी जिल्हाध्यक्ष आणि आता प्रदेशाध्यक्ष आहे. जिल्हाध्यक्ष असताना लोक माझ्या विरोधात होते, पण मी काम करत राहिलो आणि जनतेचा आशीर्वाद घेतला. माझ्या पक्षानं मला मोठा सन्मान दिला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT