Bhupendra Patel swearing ceremony tomorrow gujrat election politics esakal
देश

Bhupendra Patel : भूपेंद्र पटेल यांचा उद्या शपथविधी

गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी भूपेंद्र पटेल (वय ६०) यांची आज एकमताने निवड

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी भूपेंद्र पटेल (वय ६०) यांची आज एकमताने निवड करण्यात आल्याने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. भूपेंद्र पटेल उद्या (ता. १२) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, बी.एस. येडियुरप्पा, अर्जुन मुंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, भुपेंद्र पटेल यांनी दुपारी राज्यपालांची भेट घेऊ सरकार स्थापनेचा दावा केला.

आज राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. तत्पूर्वी मुख्यमंत्री शपथविधीच्या तारखेची घोषणा भाजपकडून अगोदरच करण्यात आलेली आहे. भूपेंद्र पटेल आणि सी.आर. पाटील दिल्लीला जात असून ते पक्षश्रेष्ठींना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्याबरोबरच गुजरात मंत्रिमंडळावर चर्चा करतील. यावेळी केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्रिमंडळाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. भाजपचे आमदार हर्ष सिंघवी म्हणाले, की गुजरात आमदारांनी भूपेंद्र पटेल यांची पुन्हा एकदा नेतेपदी निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT