देश

ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

विनायक होगाडे

गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि मोठा राजकीय भुकंप झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा होत्या. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र, आता गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. ते घाटलोडीया मतदारसंघामधून आमदार आहेत. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

ज्या नेत्यांची नावे संभाव्य मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांची यादी होती, त्या यादीपैकी कुणालाही संधी न देता वेगळं नाव समोर आलेलं दिसत आहे. विजय रुपाणींचा राजीनामा जितका आश्चर्यकारक होता तितकीच ही निवड देखील आश्चर्यकारक मानण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

Kolhapur Bus Tragedy : जिथं पत्नी-मुलांना गमावलं... तिथंच पुण्यातील विराट यांनी संपवलं आयुष्य; कोल्हापूरातील घटना डोळ्यात पाणी आणणारी

Vasai: अमली पदार्थ तस्कारांची धरपकड! वसई, मिरा-भाईंदर शहरातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

SCROLL FOR NEXT