देश

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

भूषणलादेखील कोरोनाची लागण झाली होती

शर्वरी जोशी

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता भूषण कडू (bhushan kadu) याच्या पत्नीचं कोरोनामुळे (covid19) निधन झालं आहे. ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु असतांना तिची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी भूषण आणि पत्नी कादंबरी या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. (bhushan-kadu-wife-kadambari-39-passes-away-due-to-covid19)

अभिनेता भूषण कडू व पत्नी कादंबरी या दोघांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. भूषण बोरीवलीमधील एका रुग्णालयात अॅडमिट होता. तर, कादंबरीची प्रकृती खालावल्यामुळे तिला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना काळात अनेक कलाकारांवर आर्थिक संकट कोसळलं असून भूषणदेखील आर्थिक तंगीने त्रस्त होता. या काळात त्यांना उपचारांकरता मदतीची गरज होती. म्हणूच, सोशल मीडियावर भूषण कडू आणि त्याची पत्नी कादंबरी यांच्या आर्थिक मदतीसाठी मेसेजदेखील फिरत होते.

दरम्यान, कादंबरी कोरोनावर मात करण्यास अशस्वी ठरली आणि २९ मे २०२१ रोजी तिची प्राणज्योत मालवली. भूषण व कादंबरी यांना प्रकिर्त नावाचा एक लहान मुलगा असून कादंबरीदेखील कलाविश्वाशी निगडीत होती. नाटकाचं बॅक स्टेज ती सांभाळायची. भूषण व कादंबरी या दोघांच ओळख एका नाटकादरम्यान झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT