Bank Fraud
Bank Fraud Sakal
देश

बँकिंग घोटाळा! ABG शिपयार्डने 28 बँकांना लावला 22,842 कोटींचा चूना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा समोर आला आहे. ABG शिपयार्डने 28 बँकांना तब्बल 22,842 कोटींचा चूना लावल्याचे बोलले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. ABG Shipyard कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते. (Bank Fraud Case)

सीबीआयने नोंदवलेला हा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा आहे. याप्रकरणी सीबीआयने फसवणूक प्रकरणात ABG शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर अज्ञात लोकसेवक आणि खाजगी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बँकांनी ज्या उद्देशासाठी निधी जारी केला होता, त्याऐवजी तो अन्य कारणांसाठी वापरण्यात आला असल्याचे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीने 28 बँकांकडून ज्या उद्देशासाठी कर्ज घेत 28 बँकांची फसवणूक केली. दरम्यान, हे कर्ज वाटप करण्यामागे बँकेतील अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि खासगी लोकांची संदिग्ध भूमिका असल्याचा संशय सीबीआयला आहे. फसवणूक केल्यानंतर, कंपनी आणि तिच्या अनेक संचालकांवर अनेक ठिकाणी अनेक मालमत्ता बनविल्या आणि खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला असून, याची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे.

बँकांच्या संघटनांनी सन २०१९ मध्येच सीबीआयकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. ज्यावर १२ मार्च २०२० रोजी सीबीआयनं स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर बँक संघटनांनी त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा नव्यानं तक्रार दाखल केली. त्यानंतर दीड वर्षांहून अधिक काळ तपास केल्यानंतर सीबीआयनं यावर कारवाई केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "एसबीआयसह २८ बँका आणि वित्तीय संस्थांनी २,४६८.५१ कोटी रुपयांच्या कर्जांना मजुरी दिली होती. सन २०१२-१७ या काळात आरोपींनी कट-कारस्थान रचून हे घोटाळे केल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमधूनही समोर आलंय"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT