Big blow to Congress in gujrat Two MLAs resigned
Big blow to Congress in gujrat Two MLAs resigned 
देश

काँग्रेसला मोठा झटका; दोन आमदारांनी दिला राजीनामा

वृत्तसंस्था

गांधीनगर- गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीआधी राजकीय हालचालींनी गती घेतली आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या शंकर सिंह वाघेला यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातमधील राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बुधवारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी गांधीनगरमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या दल बदलण्याच्या चर्चांना पेव फुटले होते. मात्र, काँग्रेस आमदार किरीट पटेल, ललित वसोया आणि ललित कागथारा यांनी या बातम्यांचे खंडन केले होते.
------------
कलेक्टरनं ऑफिसमध्येच केला बलात्कार; महिलेचा गंभीर आरोप
------------
भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण
------------ 
गुजरातमध्ये 19 जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपने तीन जागांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार मैदानात आहेत. आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. मात्र, एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपला मेहनत घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने भाजपची वरचढ होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT