Rahul Gandhi Esakal
देश

Rahul Gandhi: विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला काँग्रेसने दाखवली पाठ

भाजपचा पराभव करण्यासाठी नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. दरम्यान देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावली आहे, विरोधकांनी आता भाजपविरोधात जोरदार मोर्चाबांधणी सुरू केली आहे. तर यासंबधीत बैठकीला काही पक्षांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

नितीशकुमार यांच्या पुढाकाराने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार यांनी 12 जून रोजी पाटण्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित नसणार नाहीत. अखिलेश प्रसाद सिंह यांनी राहुल गांधी किंवा खर्गे दोघेही 12 जूनच्या एकता बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.(Latest Marathi News)

बिहार काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सांगितले की, राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर असून त्यांचा 12 जूनपर्यंत देशात परतण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याशी आधीच चर्चा केली होती.(Latest Marathi News)

विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले तेव्हा काँग्रेसने विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी 29 मे रोजी सांगितले होते की, नितीश कुमार यांनी त्यांना पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते, आणि त्याला काँग्रेसने त्याचा स्वीकार केला आहे.

दरम्यान या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT