देश

Election: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देशभरात विधानसभा निवडणुकांची चर्चा आणि तयारी सुरू

सकाळ डिजिटल टीम

देशभरात विधानसभा निवडणुकांची चर्चा आणि तयारी सुरू आहे. तर एकीकडे गुजरात जिंकण्यासाठी आप आणि इतर पक्ष तयारी करत असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असतानाच काँग्रेसला मोठ खिंडार पडल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

काँग्रेसच्या एकूण 26 नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. खुद्द मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिलीय. या निवडणुकांमध्ये राज्यात आपली छाप सोडत भाजपाच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

चार दिवसांनंतर म्हणजेच येत्या 12 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर पुढील महिन्यात 12 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या अवघ्या चार दिवस आधी राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच या 26 नेत्यांनी पक्ष सोडणे म्हणजेच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपाचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपाचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणाऱ्या 26 नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: परदेशात एक नियम, भारतात दुसरा का? तुकाराम मुंढेंनी ग्लोबल फूड कंपन्यांना सुनावलं; नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

Manjeet Kaur Punjab Influencer : पंजाबची इन्फ्लुएन्सर मंजीत कौरची हत्या, जंगलात नेऊन जाळलं; दोघांनी झाडाला बांधून जे केलं ते भयानक

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत एसी-एसटी विभागाचा निधी वळविल्याचा आरोप; १४,६०१ कोटींचा निधी परत करा

H1N1 and Eye Health: H1N1चा डोळ्यांवरही होतोय परिणाम? स्वाइन फ्लूनंतर दिसणारी ‘ही’ 7 लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

SCROLL FOR NEXT