navjyot singh siddhu 
देश

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : पंजाबमधील राजीनामानाट्य काही थांबायचं नाव घेत नाहीये. पंजाबच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणारी राजकीय उलथापालथ अजूनही थांबायला तयार नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनामा सोपवला होता. त्यानंतर कुणाला मुख्यमंत्री बनवलं जाईल, या शंका-कुशंकाच्या वातावरणात सरतेशेवटी नवं नाव म्हणून चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. हे सगळं सुरु आहे ते म्हणजे काही दिवसांमध्येच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी! त्यातच आता पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ज्यांच्या गळ्यात काँग्रेसने विश्वासाने प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातली होती त्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा आहे. त्यांनी नुकतंच ट्विट करत हा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी हा राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला आहे.

सुपूर्द केलेल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, माणसाचे चारित्र्य कोसळण्याची सुरुवात ही तडजोड करण्यापासून सुरु होते. मी पंजाबच्या भविष्या आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळेच मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा देतो आहे. मी काँग्रेसची सेवा करत राहिन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT