Covishield and Covaxin vaccines
Covishield and Covaxin vaccines टिम ई सकाळ
देश

मोठी बातमी! कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लसीकरण हा रामबाण उपाय मानला जात आहे. देशातील कोरोनाची लढाई लढण्याकरीता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा खारीचा वाटा आहे. आता या दोन्ही लस खुल्या बाजारात विकण्यास केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांच्या एक्स्पर्ट पॅनेलने केन्द्र सरकारकडे शिफारस केली आहे. हि शिफारस मान्य झाली तर या दोन्ही लस विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींनी कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भुमिका बजावली आहे. या दोन्ही कंपनीने लसच्या खुल्या बाजारातील विक्रीसाठी मान्यता मिळावी म्हणून अर्ज केले आहेत. या संदर्भात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ञ समितीने याबाबत पाठपुरावा केला आणि त्यानंतर या दोन्ही लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या शिफारसीवर केंद्र सरकार काय भुमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT