Tirath Singh Rawat  File Photo
देश

उत्तराखंडमध्ये राजकीय उलथापालथ; CM तीरथसिंह रावत राजीनामा देणार?

सध्याची राजकीय परिस्थिती पाहून तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे.

सुशांत जाधव

उत्तराखंड सरकारमध्ये मोठा उलटफेर होण्याचे संकेत मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिले आहेत. त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. केंद्रीय नेत्याकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्यास उत्तराखंडला पुन्हा एकदा नवा मुख्यमंत्री मिळू शकतो. यावर्षीच त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. (Big Political Update Uttarakhand Tirath Singh Rawat Offers To Resign)

तीन दिवसांपासून मुख्यमंत्री तीरथसिंह रावत राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. शुक्रवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. मागील 24 तासांतील ही दुसरी भेट होती. या भेटीनंतर उत्तराखंडमध्ये पुन्हा नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. नड्डा यांच्या दिलीतील निवासस्थानी अर्धा तास झालेल्या बैठकीनंतर रावत यांच्या राजकीय भविष्याबाबत चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहून तीरथसिंह रावत यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यासंदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीला एक वर्षाहूनही कमी अवधी उरला आहे. याशिवाय पदावर कायम राहण्यासाठी तीरथ सिंह यांना 10 सप्टेंबरपर्यंत विधानसभा सदस्य होणे देखील अनिवार्य आहे. पौड़ीतून खासदारकी मिळवलेल्या रावत यांनी 10 मार्चला मुख्यंमंत्री पदी विराजमान झाले होते.

नड्डांसोबतच्या बैठकीनंतर रावत यांनी प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिली होती. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी त्यांना पोट निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भातील सर्व अधिकार निवडणूक अयोगाकडे असल्याचे सांगत त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं. केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असेही ते म्हटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT