Pawan Khera News
Pawan Khera News sakal
देश

Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरा यांना मोठा दिलासा! अंतरिम जामीन १० एप्रिलपर्यंत वाढवला

सकाळ डिजिटल टीम

Congress Party Latest news: काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टिप्पणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने खेडे यांच्या जामीनाला १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तसेच त्यांच्यावर लखनऊ आणि बनारसमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांवर लखनऊमध्ये खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

गेल्या महिन्यात २२ फेब्रुवारीला पवन खेरा यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मुंबईतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा त्यांनी अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर आसाम, बनारस आणि लखनऊमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

दरम्यान सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या विरोधातील एफआयआर एकत्र करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण आता लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे. 

खेरा यांना न्यायालयासमोर नियमित जामिनासाठी अर्ज करण्याची स्वातंत्र्य असेल असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. खेरा यांनी आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथित वक्तव्य केल्याबद्दल खेरा यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. 

रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पवन खेरा दिल्ली विमानतळावरून इंडिगोच्या विमानात चढला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला विमानातून उतरवून ताब्यात घेतले होते.

हे प्रकरण तात्काळ सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि सर्वोच्च न्यायालयाने दुपारी या प्रकरणावर सुनावणी करताना पवन खेरा यांना २ मार्चपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. यानंतर न्यायालयाने पवन खेरा यांच्या जामिनाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. अखेर पवन खेरा याला १० एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT