Crime News esakal
देश

8 वर्षांच्या मुलीवर 62 वर्षाच्या वृद्धानं केला बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

एका व्यक्तीनं वृद्धाला हे लज्जास्पद कृत्य करताना पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवला.

बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीवर 62 वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केलाय. जेव्हा ही व्यक्ती मुलीवर बलात्कार करत होती, तेव्हा कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तक्रार करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले, तेव्हा आरोपीच्या नातेवाईकांनी त्यांना मारहाण करून तेथून पळवून लावलं.

त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस (Bihar Police) ठाण्यात तक्रार केली. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आरोपी वृद्धाच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी घर सोडून पळून गेला आहे. गुरुवारी सायंकाळी मुलगी गावातील मंदिराजवळ खेळत होती. यावेळी मुलीला एकटी पाहून गावातील मोहन साह यानं तिला फूस लावली आणि टॉफीचं आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केलंय.

दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीनं वृद्धाला हे लज्जास्पद कृत्य करताना पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण गावात पसरवला. जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्यांनी मुलीला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलीनं संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. याबाबत तक्रार करण्यासाठी मुलीचे आई-वडील वृद्धाच्या घरी गेले असता, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मारहाण करून हाकलून दिलं. यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केलाय. एफआयआरमध्ये मोहन साह यांच्यासह बन्हू साह, साहबू साह, शत्रुघ्न साह, राजू साह आणि गोविंद साह यांची नावं आहेत. यापूर्वी बिहारमधील बांका इथं आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT